Share

अखेर कंगना शेतकऱ्यांपुढे झुकली; माफी मागितल्याने वातावरण जल्लोषमय!

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, कंगना शुक्रवारी पंजाबमधील किरतपूरमध्ये जाताना काही शेतकऱ्यांनी घेरल्याचा आरोप केला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओ शेअर शेतकऱ्यांनी तिच्या कारला कसे घेरले आणि तिच्यावर हल्ला केला असल्याचे सांगितले आहे.

कंगनाने शेअर केलेला व्हिडिओ तिच्या गाडीच्या आतून शूट करण्यात आला असून वाहनाभोवती उभे असलेले शेतकरी मुर्दाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत. देशात अशा प्रकारच्या मॉब लिंचिंगच्या घटना घडत आहेत. येथे सुरक्षा नसेल, तर येथे तशीच परिस्थिती निर्माण होईल, असे कंगनाने म्हटले आहे.

मात्र या दरम्यान, कंगनाने शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. कंगनाची गाडी अडवल्याचं कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. सुरक्षेसाठी कंगनाच्या कारला पोलीस कर्मचाऱ्यांनी घेरलं. यावेळी पंजाब पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण कंगनाने माफी मागण्याच्या आग्रहावर शेतकरी ठाम राहिले.

यावेळी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कंगनाच्या गाडीसमोर महिलांनी संताप व्यक्त केला आणि त्यांनी माफी मागण्यास सांगितलं. सुरुवातीला शेतकऱ्यांची संख्या कमी होती, पण हळू हळू शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली.  जमाव वाढत असल्याचं लक्षात घेत कंगना गाडीबाहेर येऊन शेतकरी महिलांची माफी मागते.  या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ कंगनाने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!