Share

देवेंद्र फडणवीसांनी साहित्य संमेलनाला न जाण्यामागचं कारण केलं स्पष्ट

Published On: 

नाशिक: ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bhartiy Marathi Sahitya sammelan) नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात सुरवात करण्यात आली. सुरवातीपासूनच साहित्य संमेलनाबाबत अनेक वादविवाद होत असल्याचे चित्र दिसले. यातच आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. कालपासून सुरु झालेल्या साहित्य संमेलनाला फडणवीस नाशिकमध्ये असून देखील हजर राहणार नसल्याचे ट्विट करत सांगितले आहे.

नाशिकामधील संमेलनस्थळाला कुसुमाग्रज (Kusumagraj) आणि वीर सावरकरांच्या (Veer  Savarkar) नावावरुन झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं आहे. ट्विट फडणवीस म्हणाले की, ‘नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव!’

‘या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे’, अस म्हणत फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे आणखी एक ट्विट करत ते म्हणाले, मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? असा सवालही त्यांनी केला आहे.

काही दिवसापूर्वीच साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!