Share

Jitendra Awhad। “बोलण्याची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का?” जितेंद्र आव्हाड यांचा मुनगंटीवारांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad। मुंबई : राज्यात शासकीय कार्यालयात आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ने संभाषणाला सुरुवात करण्याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द आहेत. 26 जानेवारीपर्यंत प्रत्येकाची मानसिक तयारी अशी व्हावी की, ‘वंदे मातरम’पासून दिवसाची किंवा संवादाची सुरूवात व्हावी. विधानसभेच्या अधिवेशनाची सुरूवातही वंदे मातरमने मी करतो. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकाने या अभियानामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं आहे. यानंतर यावर आता माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, मुनगंटीवार यांनी सांगितलं नाही, त्यांनी आदेश काढला आहे. सांगणं वेगळं असतं आणि आदेश वेगळं असतं! भारतीय संस्कृतीमध्ये नमस्काराने भारतीय संस्कृती सुरू होते. या संस्करांमध्ये नमस्कार आहे. कित्येक लोक जयभीम म्हणतात, कित्येक लोक जय हिंद म्हणतात. साधारण पोलिस अधिकारी बोलताना जय हिंद शब्दाने बोलणं सुरू करतात .कोणी सस्रियाकाल म्हणेल कोणी जय भीम म्हणेल. कोणी नमस्कार म्हणेल किंवा कोणी वंदे मातरम् म्हणेल. त्यातून येणाऱ्या भावना महत्वाच्या आहे, असं म्हणत त्यांनी मुनगंटीवार यांच्या निर्णयावर टीका केली आहे.

तसेच पुढे आव्हाड म्हणाले कि, अशी जोर जबरदस्ती करू नका. हा देश स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, श्वास कुठून कसा घ्यावा तो पण तुम्हीच ठरवणार का? इतकाही भारताचा श्वास गळा घोटण्याचा प्रकार करू नका. मला हॅलोच म्हणायचं आहे. मला जय भीम म्हणायचं आहे. आता ते जबरदस्ती आमच्या कडून म्हणवून पण घेणार की जबरदस्ती जेलमध्ये टाकणार. पोलिसांकडून केस टाकणार कायदा मोडला म्हणून 353?”, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, याआधी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्वी जय महाराष्ट्र म्हणायचे. त्यामुळे आता जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आता थेट सुधीर मुनगंटीवार यांनाच जय महाराष्ट्र म्हणायचे की वंदे मातरम हे विचारलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला. पुढे भुजबळ म्हणाले कि, शिवसैनिक जय महाराष्ट्र म्हणतात. पोलीस जय हिंद बोलतात. त्यात कोणी वंदे मातरम म्हटले तर गैर काय? असा सवाल करतानाच कायद्याने आशा गोष्टी होत नाहीत. मी जय महाराष्ट्र नाहीतर जय हिंद बोलेल.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!