Shiv Sena । मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र काल झालेल्या खातेवाटपात शिवसेनेच्या वाट्याला जुनीचं खाती आली. तर, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनकडे असणारी काही खाती देखील भाजपकडे गेली आहेत. त्यामुळं शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात गेलेल्या मंत्र्यांच्या हाती काय लागलं हा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. तर कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. यानंतर विरोधकांकडून शिंदेंच्या या निर्णयावर सडकून टीका करण्यात आली आहे. यावरून आता शिवसेना मुखपत्र सामानातून संजय राठोडांसह शिंदे गटावर सडकून टीका करण्यात येत आहे.
नेमकं काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात ?
प्रत्येकाला काही ना काही तरी मिळायलाच हवे अशी शिंदे गटातील सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आता या पन्नास जणांना काही ना काही हवे म्हणजे काय? फूल ना फुलाची पाकळी तरी म्हणे आपल्याला मिळावी, असे ते म्हणत आहेत. मग आता यातील फुले कोणास? पाकळी कोणाला व उरलेले काटे कोणाला मिळणार? हे प्रश्न आहेतच. या पन्नास जणांना ‘खोकी खोकी’ भरून मध तर आधीच मिळाला आहे, पण नुसती मधात बोटे बुडवून आणि चाटून काय होणार? आता मंत्रीपद हवेच. निदान महामंडळांचा बार तरी उडवाच. नाही तर या क्रांतीचा फायदा नाही, असे शिंदे गटाचे लोक उघडपणे बोलू लागले.
पुन्हा ही पहिल्या विस्तारानंतरची भानगड आहे. दुसऱ्या विस्तारानंतर शिंदेंच्या गावात व गटात रोज बारा भानगडींना तोंड फुटेल व प्रत्येक भानगडबाजास खोकीवाटप करताना केस-दाढी गळून जाईल. शिंदे गटाचे मंत्री जिथे जातील तिथे निदर्शने होत आहेत. संजय राठोड हे महामानव त्यांच्या गावात गेले. तेथे ट्रकभर फुले त्यांच्यावर उधळण्यात आली. त्या प्रत्येक फुलाच्या पाकळीतून पुण्याच्या ‘निर्भया’ची किंकाळीच ऐकू येत असावी. पण सरकारच जर बारा भानगडी व लफडी करून आले असेल तर त्या अबलेच्या किंकाळ्यांना विचारतेय कोण?
मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणे त्यांच्या गटाच्या मंत्र्यांना बोलावून समज दिली की, वेडीवाकडी कामे करू नका. असे काही केलेत तर पाठीशी घालणार नाही. कोणतीही भानगड खपवून घेतली जाणार नाही. हे शिंदे यांनी सांगावे? कमाल आहे! मुळात स्वतः शिंदे व त्यांचा गट हीच एक भानगड आहे. प्रत्येकाला लालूच दाखवून फोडले आहे. पैसा, लाभाची पदे व ईडीचा धाक यातून हे शिंदे गटाचे भानगडबाज सरकार आले. आता या गटास सांभाळण्यासाठीही भानगडींचाच आश्रय त्यांना घ्यावा लागेल.
महत्वाच्या बातम्या :
- Shiv Sena : एक शिंदे गट बारा भानगडींचा फुकट मॅटिनी शो बघायला काय हरकत आहे?; शिवसेनेचे टीकास्त्र
- Chhagan Bhujbal । तुम्हीच सत्तेसाठी आला नव्हता, तर मग आता रडता कशाला?; भुजबळांचा शिंदे गटावर निशाणा
- Chandrashekhar Bawankule | विनायक मेटेंचा घात की अपघात यासाठी तपास यंत्रणा लावली आहे – चंद्रशेखर बावनकुळे
- Abdul Sattar | भाजपने ८० टक्के खाते स्वत:कडे ठेवली? अब्दुल सत्तार म्हणाले…
- Jitendra Awhad | “गळा घोटण्याचा प्रकार करु नका” ; सुधीर मुनगंटीवारांच्या ‘त्या’ निर्णयावर आव्हाडांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

