मुंबई : कोरोनाच्या पाश्ववभूमीवर सर्वत्र लॉकडाउन जाहीर केला आणि यामुळे मजुरांचे खूप मोठे हाल होताना दिसत होते. रोजगार नसल्यामुळे परराज्यातून महाराष्ट्रात आलेले मजूर, कामगार आता त्यांच्या राज्यांमध्ये गेले आहेत. पण आता लॉकडाउन देखील शिथिल करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे इथले उद्योगधंदे सुरू झाले की ते पुन्हा येतील. तेव्हा परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नवे धोरण आखण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
“राज्यात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या नोंदणीबाबत धोरण ठरविण्यासाठीच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. असे वृत्त लोकमतने दिले आहे.
दरम्यान, “राज्यातले उद्योगधंदे सुरू झाले की परप्रांतीय पुन्हा येतील. त्यावेळी त्यांची चाचणी करुनच त्यांना राज्यात प्रवेश देण्यात यावा. आपल्या राज्यातील परिस्थिती आपल्याला माहीत आहे. मात्र तिथल्या परिस्थितीची कल्पना आपल्याला नाही. त्यामुळे येताना त्यांची तपासणी केली जावी”, अशी सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिल्या होत्या. परप्रांतीय मजूर पुन्हा राज्यात येतील तेव्हा त्यांची स्थलांतरित कायद्यांतर्गत नोंद करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.
एकही केस लपवायची नाही, आपण सत्याला सामोरे जाऊ, जे आहे ते लोकांसमोर ठेऊ !
राहुल गांधीनी शेरो-शायरीच्या माध्यमातून अमित शाह यांना काढला चिमटा
दिलासादायक : हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत कोरोनामुळे आठडयाभरात एकही मृत्यू नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

