Share

Sudhir Mungantiwar | मंत्रिमंडळात आणखी 23 मंत्री होऊ शकतात – सुधीर मुनगंटीवार

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार कधी केला जाणार, हा सवाल केला जात होतो. सरकार स्थापन झाल्याच्या एक महिनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 9 ऑगस्ट रोजी पार पडला. त्यावेळी शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ म्हणजे एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळ मध्ये समावेश करण्यात आला. या विस्तारानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच यासंदर्भात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य केलं आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य-

राज्यामध्ये 43 मंत्री असतात. त्यापैकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसहीत शिवसेना-भाजपाचे प्रत्येकी 9 असे 20 मंत्री सध्या मंत्रिमंडळात आहे. लवकरच मंत्रिमंडळात अन्य 23 मंत्र्यांचा समावेश होईल असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

कधी होणार मंत्रीमंडळाचा पूर्ण विस्तार?-

तसेच मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार कधीपर्यंत होईल असा सवाल विचारला असता, येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा विस्तार होईल, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. या विस्तारामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोणाला मिळणार संधी?-

पुढे सुधीर मुनगंटीवार असंही म्हणाले की, लवकरात लवकर पालकमंत्र्यांचीही घोषणा सरकारकडून निश्चितपणे केली जाणार आहे. ही घोषणा या गणेशोत्सवातच होणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!