मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शहरातील अनेक ठिकाण कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत, त्यापैकी मुंबईतील धारावी परिसर हा एक आहे. पण आता धारावीतून जरा दिलासा मिळत आहे, कारण धारावीमध्ये परिस्थिती आता हळूहळू सुधारत आहे. धारावीमध्ये मोठया प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. सहा जून रोजी १० आणि सात जून रोजी फक्त १३ कोरोना रुग्णांची धारावीमध्ये नोंद झाली.
रुग्णसेवेसाठी सज्ज झालेले पालिका दवाखाने आणि खासगी दवाखाने, ज्येष्ठ नागरिकांचा शोध घेऊन केलेले उपचार, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संशयितांचे विलगीकरण यामुळे धारावीमधील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश येत आहे.
धारावीत आतापर्यंत १८९९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ४६.८५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. धारावीतील मृत्यूचे प्रमाण ३.७६ टक्के असून आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.
२९ एप्रिलला धारावीमध्ये सर्वाधिक ९१ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तर, ३० मे पासून धारावीत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.
धारावीमध्ये आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. इथे कोरोनाचा झालेला प्रादुर्भाव सर्वांसाठीच चिंतेचा विषय होता. पण परिस्थिती आता हळूहळू सामान्य होत चालली आहे.
राज्यात आजपासून पुन:श्च हरी ओम !, वाचा काय होणार सुरु…
कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई आणि महाराष्ट्राला वाचवणाऱ्या सगळ्यांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
