Share

राहुल गांधीनी शेरो-शायरीच्या माध्यमातून अमित शाह यांना काढला चिमटा

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून आज आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक व्हर्च्यअल रॅली काल घेतली.

जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्त्यांनी शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकले असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे.

राजभवनाचे ट्विट आले अन सगळ्यांना कळले मिलिंद नार्वेकर आहेत राज्यपालांबरोबर !

दरम्यान, यावेळी बोलताना चीन बरोबर सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी “भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे” असे विधान अमित शाह यांनी केले होते.

दरम्यान, आता अमित शाह यांचे हे विधान टि्वटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे. सीमेवरची परिस्थिती काय आहे हे सर्वाना ठावूक आहे पण मनाला खुश ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!