Share

Pankaja Munde | “पंकजा मुंडेंना मंत्रीमंडळात घ्यावं…”, बहिणीसाठी बहिणीची धाव

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करून राज्यात सत्ता प्राप्त केली. त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला. मात्र त्यामध्ये पंकजा मुंडे यांना कोणतंही मंत्रीपद मिळालं नाही. तरी दुसरा विस्तार अजून व्हायचं बाकी आहे. कालच राज्य सरकारने पालकमंत्री जाहीर केला. मात्र, पंकजा मुंडे यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात न केल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. पंकजा मुंडे यांना विधानपरिषद, राज्यसभा ही देण्यात आले नाही, त्यात आता मंत्रिपद ही न दिल्याने त्यांची बहीण आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.

प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली इच्छाः

पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळावं जशी जनतेची इच्छा आहे हीच इच्छा माझी देखील आहे, असं प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे. प्रीतम मुंडेंनी त्यांची इच्छा पहिल्यांदाच जाहीर केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पंकजा मुंडे ह्या दरवर्षीप्रमाणे सावरगाव येथे समाजाला संबोधित करतीलः

दसरा मेळावा हा भगवान भक्ती गडावर होणार आहे. पंकजा मुंडे ह्या दरवर्षीप्रमाणे सावरगाव येथे समाजाला संबोधित करतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. यंदा मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या दिवशी भगवान बाबांचे आशीर्वाद घेण्याची ही परंपरा आहे, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, राज्यात भाजपचं सरकार असून पंकजा मुंडे यांना कोणतंही स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!