Share

“माझी पोस्ट डिलिट करणार नाही,” ; केतकी चितळे न्यायालयात म्हणाली…

Published On: 

मुंबई : केतकी चितळे तिच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे केतकी चांगलीच अडचणीत आली आहे. तिला आता अटक झाली असून येत्या १८ मेपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिच्या या वादग्रस्त पोस्टमुळे विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केतकीच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. मात्र केतकी चितळे हिने कोर्टात आपली बाजू मांडत असताना, आपण काही केल्या ती पोस्ट डिलिट करणार नाही, असं सांगितलं. केतकीला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

केतकीने न्यायालयात आपली बाजू मांडली. यावेळी ती म्हणाली, “मी माझी पोस्ट डिलीट करणार नाही, मला बोलण्याचं, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य नाही का? मी ती पोस्ट स्वत: लिहिली नाही. मी ती कुठूनतरी कॉपी केली आहे.” आता तिच्या या वक्तव्याचा अनेकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. न्यायालयाने केतकीला १८ मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील निषेध नोंदवला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या सभेतून केतकीचा समाचार घेतला होता.

पोलीस कोठडीनंतर आता केतकीला जामीन मिळणार की तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार याची स्पष्टता १८ मे च्या सुनावणी दरम्यान होणार आहे. केतकीच्या फेसबूक पोस्टमध्ये “ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक” अशी अतिशय हीन भाषा वापरले आले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. यानंतर या पोस्टवर विविध प्रतिक्रिया येत असून, केतकी चितळेने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!