Share

“कुजकट टोमणे, भारंभार इशारे आणि पोकळ धमक्या”; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भाजप नेत्याची टीका

Published On: 

मुंबई: काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत भाजपाचं हिंदुत्व नकली असल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी या सभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर अनेक आरोप केले. आता या आरोपाला  भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर येत आहेत. चहुबाजूंनी त्रस्त झालेल्या पक्षप्रमुख कम मुख्यमंत्र्यांनी आपला त्रागा सभेतून व्यक्त केला असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटलय की, “तेच तेच पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी एवढी मोठी सभा घेण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा ई सभा घेतली असती तर सर्वांचे कष्ट तरी वाचले असते. बाकी चहुबाजूंनी त्रस्त झालेल्या पक्षप्रमुख कम मुख्यमंत्र्यांनी आपला त्रागा आजच्या सभेतून व्यक्त केला. कुजकट टोमणे, भारंभार इशारे आणि पोकळ धमक्या यांच्यापलीकडे पक्षप्रमुखांचे भाषण गेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून स्वतःच्या हिंदुत्वाचं सत्व गमावल्यानंतर भाजपाच्या हिंदुत्वाला बोल लावण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुखांनी केला. पण भाजपाचं हिंदुत्व किती प्रखर आणि प्रभावी आहे. याची माहिती सर्वसामान्य जनतेला आहे. बाकी महापालिका निवडणुका जवळ आल्याने मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असे घासून गुळगुळीत झालेले मुद्दे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला”.

त्यावरून संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरून भाजपावर निराधार आरोप केले. पण प्रत्यक्षात ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध केला. त्यांच्याबरोबर आपणच सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलोय, हे मात्र पक्षप्रमुख सोईस्करपणे विसरले. औरंगाबादच्या नामांतराबाबत हात वर करत मुख्यमंत्र्यांनी आपली हतबलता व्यक्त केलीय. एकंदरीत मोठा गाजावाजा करून अखेर सुपरडुपर फ्लॉप झालेल्या सिनेमासारखं हे भाषण झालं. त्यात ना हिंदुत्वाचा हुंकार होता. ना महाराष्ट्राच्या विकासाची दिशा होती. ना स्वतःच्या शिवसैनिकांना काही संदेश होता. होती ती केवळ वैफल्यग्रस्तता, अगतिकता आणि त्रागा…असेही केशव उपाध्ये म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!