Share

“…तेव्हा बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंकडे राहायला आले”; मनसे नेत्याचा गौप्यस्फोट

Published On: 

मुंबई : काल झालेल्या मुंबईतील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा मुन्नाभाई असा उल्लेख केला. यावरून आता उद्धव ठाकरेंवर मनसे नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले, “मुन्नाभाई हा चित्रपट उद्धव ठाकरेंनी पूर्ण पाहायला हवा होता. मग सभेत आपली चूक झाल्याचं त्यांना कळले असते. मुन्नाभाई गांधींजीचा अभ्यास करतो म्हणून त्याला गांधी दिसले. बाळासाहेबांना जाऊन इतके वर्ष झाली तरी तुम्ही कधी ते दिसल्याचं बोलला नाही. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात वेगळं नातं होतं. आज पुत्रप्रेमाचा डंका ते वाजवत आहेत. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे दिसत असतील तर केमिकल लोचा कसा? असा सवालही केला. तसेच आरोप करण्याअगोदर तो सिनेमा तरी पाहायला पाहिजे होता. कुणीतरी चिठ्ठी दिली आणि ते सभेत बोलले, असा टोलाही प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

तसेच “२६ जुलै २००५ रोजी ज्यावेळी मुंबईत महापूर आला तेव्हा उद्धव ठाकरे पत्नी मुलांसह हॉटेलला राहायला गेले होते. तेव्हा बाळासाहेबांना कुठे सोडलं होते? तेव्हा बाळासाहेब मोठ्या हक्काने कृष्णकुंजवर राज ठाकरेंकडे राहायला आले होते. गुरु-शिष्य अशी बाळासाहेब आणि राज ठाकरेंचं नातं होते. ही आठवण सांगितलेली राज ठाकरेंना आवडणार नाही, मी त्यांचा ओरडा खाईन पण हे सांगायला हवं. पण ही सत्य घटना आहे. डंका पिटून हिंदुत्व होत नाही”. अशी टीका करत प्रकाश महाजनांनी गौप्यस्फोट केला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!