Share

“पुढील पाच वर्षेही महाविकास आघाडीचीच सत्ता”; शरद पवारांचं वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : “आगामी राज्यसभा सदस्य निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचे प्रत्येकाचे आपले संख्याबळ आहे. त्यात राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून येऊन आमच्याकडे काही मते शिल्लक राहणार आहेत. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडेही मतदान आहे. त्यामुळे उरलेल्या मतांमधून आम्ही युवराज संभाजीराजेंना मदत करू”, असे शरद पवार म्हणाले. यासह शरद पवारांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबद मोठे विधान केले आहे.

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तीनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बसून निर्णय घेतील. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे तर पूर्ण करेलच. परंतु, पुढील पाच वर्षे सत्तेत राहील”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

वाढलेली महागाई, त्यात केंद्राचा इंधनावरील कर सर्वाधिक आहेत. तो कमी करण्याची गरज आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या किमती, महागाई वेळीच रोखली नाही तर त्याचे परिणाम वेगळे असतील, असे शरद पवार म्हणाले. तसेच भाजपचे चंद्रकांत पाटील, नारायण राणे हे सरकार पाडण्याच्या तारखांवर तारखा देतात. ते आम्ही एन्जॉय करतो, असा टोलाही यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी लगावला.

निवडणुका एकत्र लढायच्या की वेगवेगळ्या प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील –

निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने आगामी निवडणुका एकत्र लढायच्या की वेगवेगळ्या, या अनुषंगाने पंधरा दिवसांत निर्णय होईल. वेगवेगळे लढून नंतर एकत्र येणे अथवा एकत्रित मिळून लढणे. त्यावर प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असे शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!