“…मगच निर्बंध शिथिलतेसंदर्भात निर्णय घेणार”, अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना निर्बंध शिथिलतेबाबत स्पष्टीकरण (Ajit Pawar explanation regarding Corona restrictions in the state) दिले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आणखी दोन आठवडे थांबून कोरोना निर्बंध शिथील करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. असे अजित पवारांनी (Deputy Chief Minister Ajit Pawar) म्हटले आहे.

देशात तसेच जगभरात कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत घट झाली आहे. मात्र, मृतांची आकडेवारी वाढत आहे. मृत्यू का वाढत आहेत या कारणांचा शोध घेत आहोत. यामध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत ३० टक्के घट झाली. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतही ४२ टक्के घट झाली आहे. आता पुण्यात ४५ हजार रुग्ण आहेत. म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, रुग्ण जरी कमी झाले असले तरी घाईगर्दीत निर्णय घेणार नाही. अजून एक किंवा दोन आठवडे थांबणार मगच शिथिलतेसंदर्भात निर्णय घेणार असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे.

तसेच गेल्या आठवड्यात आपण पहिली ते आठवी शाळा हाफ डे सुरु केल्या होत्या. आता या आठवड्यापासून शाळा पूर्ण दिवस सुरू करणार असल्याचेही अजित पवारांनी म्हटले आहे. (Pune school decision) तर पुण्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत पुणे शहर आणि पिपंरी चिचंवड येथे १५ ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी केंद्राशी बोलणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: