“कोहली आणि कुंबळे यांचे जमत नव्हते” ; माजी व्यवस्थापकांचा गौफ्यस्फोट

मुंबई: अनिल कुंबळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक काम करत असताना त्यांच्या आणि कर्णधार विराट कोहली मध्ये वाद असल्याचे प्रकरण जुने आहे. त्या वादांवर चर्चा जुनी झाली असली तरी आता त्यावर एक नवीन गौफ्यस्फोट झाला आहे. ज्यात त्या दोघांमध्ये खर्च काही अलबेल नव्हते हे जाहीर झाले आहे.

अनिल कुंबळेने २०१७ मध्ये अचानक भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले होते. कुंबळेचा कार्यकाळ फक्त एक वर्ष टिकला आणि माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले की विराट कोहलीसोबतचे त्यांचे संबंध बिघडले होते. आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी कुंबळे-कोहली संबंधांवर मोठा खुलासा केला आहे. शेट्टी म्हणाले की ” काही लोक होते ज्यांना कुंबळेने संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत राहावे असे वाटत नव्हते. कोहली आणि कुंबळे यांच्यात दारी निर्माण झाली होती. आणि या प्रकरणात विराटची भूमिका महत्वाची होती. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वी लंडनमध्ये झालेल्या एका मीटिंगबद्दल मला नंतर कळले, ज्यामध्ये आपण पाकिस्तानकडून हरलो होतो. कठीण समयी खेळाडूंसाठी उभे न राहिल्यामुळे आणि ड्रेसिंग रूममध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण केल्यामुळे विराट अनिलवर नाखुश होता.”

अनिल कुंबळे यांनी पद सोडल्यानंतर रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शास्त्री यांनी ४ वर्षाहून अधिक काळ संघाचे कारभार सांभाळले आणि २०२१ च्या टी-२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत बाहेर पडल्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. राहुल द्रविड सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

महत्वाच्या बातम्या