Share

Rajesh Tope | पवार साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे, राजेश टोपेंचा राज्य सरकारला इशारा

Published On: 

Rajesh Tope | जालना : शरद पवार साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागला पाहिजे ही सरकारची जबाबदारी असल्याचा इशारा राष्ट्रावादीचे आमदार राजेश टोपे यांनी राज्य सरकारला दिला. आज राष्ट्रवादी काँग्रसेचे आध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वारंवार फोन करून एक माथेफिरु शरद पवार यांना शिव्या देत असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

या माथेफिरुचा पोलिसांनी तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी टोपे यांनी केली. तसेच पवार साहेबांच्या केसलाही धक्का लागला नाही पाहिजे याची सर्व जबाबदारी ही राज्य सरकारची असून पवार साहेबांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही टोपे यांनी केली.

काय आहे प्रकरण-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. सिल्व्हर ओक येथील शरद पवार यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलाने पवार यांची हत्या करणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले.

सिल्वर ओकवरील पोलीस ऑपरेटरने या धमकी संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. आरोपींनी हिंदीत धमकी दिली. या घटनेनंतर जवळच्या गमदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध 294 आणि 506 (2) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याची ओळख पटली आहे. बिहारमधून हा फोन आला. फोन करणार्‍याने यापूर्वीही पवार यांना फोनवरून धमकी दिली आहे. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि समजावून सांगितल्यावर सोडून दिले होते. दरम्यान या व्यक्तीने पुन्हा धमकी दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!