🕒 1 min read
मुंबई: सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप पत्यारोप करत असताना पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मास्टर सभेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली होती, यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर सभा घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यांनतर आता भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. आज पुन्हा एकदा शिवसेनेने सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
“उत्तर भारतीय श्रीराम व हनुमानाचे भक्त आहेत. श्रीरामाचे वास्तव्य महाराष्ट्रात होते. नाशिकचे पंचवटी आणि नागपूरजवळील रामटेक हे प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झाले, पण नागपूरच्या फडणवीसांनी श्रीरामाचा सत्यवचनाचा गुण घेतलेला दिसत नाही. ते सध्या फक्त खोटे आणि खोटेच बोलत आहेत. राज्य सोडावे लागले तेव्हा श्रीरामाने तो निर्णय स्वीकारला. त्यांना वैफल्य आले असे रामायणात कोठेच दिसत नाही. सीतामाईनेही तो निर्णय स्वीकारला हे विशेष, पण फडणवीसांची रामभक्ती तकलादू आहे. नाव रामाचे घेतात व वागतात बिभीषणाप्रमाणे. फडणवीस यांना वैफल्याने ग्रासल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे”, असा निशाणा सामना अग्रलेखातून शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांवर साधला आहे.
तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या बाबतीत हा स्वप्नदोष शक्य नाही. मुळात अयोध्येत बाबरी पाडली तेव्हा भाजपने हात वर करून पळ काढला व तो दिवस त्यांच्यासाठी ‘काळा दिवस’ होता. नंतर त्या ‘काळय़ा दिवसा’चा हे लोक विजय दिवस वगैरे साजरा करू लागले. त्या ‘काळय़ा दिवसा’च्या शिवसेनेस मिरच्या झोंबण्याचे कारण नाही. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा फडणवीस नक्की कोठे होते व त्यांचे वय काय होते हा नव्याने संशोधनाचा विषय ठरला आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
