Share

“आम्ही बिभीषण मग तुम्ही कोण रावण?”; केशव उपाध्ये यांचा शिवसेनेला टोला

Published On: 

मुंबई: सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते एकमेकांवर आरोप पत्यारोप करत असताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेने सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. फडणवीस रामाचे नाव घेतात आणि बिभीषणाप्रमाणे वागतात असा आरोप केला. आता या आरोपाला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर शिवसेनेला दिले आहे.

केशव उपाध्ये म्हणाले, ‘सामना’चे कार्यकारी संपादक व राष्ट्रवादीचे शिवसेनेतील प्रवक्ते  देवेंद्नजींना “नाव रामाचे घेतात अन् बिभीषणाप्रमाणे वागतात” असं म्हणतात. अहो, बिभीषण हा रामभक्तच होता. रावणासोबत राहून त्याने कधीही रामाची भक्ती सोडली नाही. रावणाने जो अत्याचार केला त्याविरोधात जाऊन ते प्रभू रामाच्या सैन्यासोबतच रावणाविरोधात युद्धात उभे राहिले. वाईट मार्गाला लागलेल्या भावालाही त्याने सोडले नाही. तुम्ही इतकी वर्ष याच बिभीषणासोबत एकत्र होता. मग तुम्ही कोण ‘रावण’? हो हेच सत्य आहे असा टोला लगावला.

तर भ्रष्टवाद्यांना हाताशी धरून तुम्ही राज्याचा कारभार रसातळाला नेला. खुलेआम वसुली होऊ लागली. बदल्यांचे रॅकेट तयार झाले. पुरावा नष्ट करण्यासाठी हत्या करण्यापर्यंत मजल गेली. राज्याच्या कारभाराचे तीन तेरा वाजले. तुमच्या अहंकाराची लंका जाळून हा बिभीषण महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी लढतोय. त्यामुळे वाचाळवीरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असंही केशव उपाध्ये यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!