Share

IPL 2022 PBKS vs DC : लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीपनं दिल्लीला थोपवलं; पंजाबपुढं १६० धावांचं लक्ष्य!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ६४वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात रंगत आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने पंजाबला १६० धावांचे आव्हान दिले आहे. पंजाबचा कप्तान मयंक अग्रवालने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  दोन्ही संघांना प्लेऑफसाठी विजयाची नोंद करणे आवश्यक आहे.

दिल्लीचा डाव

लियाम लिव्हिंगस्टोनने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला झेलबाद करत दिल्लीला लवकर धक्का दिला. त्यानंतर शॉन मार्श आणि सरफराज खानने अर्धशतकी भागीदारी केली. राहुल चहरने सरफराजला बाद करत भागीदारी मोडली. सरफराजने १६ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा केल्या. ललित यादवही (२४) संथ खेळून बाद झाला. लिव्हिंगस्टोनने कप्तान ऋषभ पंत (७) आणि रोवमन पॉवेल (२) यांचा अडथळा दूर करत दिल्लीचा बुरुज ढासळवला. १७व्या षटकात मार्शने आपले अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात तो बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ६३ धावा केल्या. शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने दिल्लीला जास्त धावा करू दिल्या नाहीत. दिल्लीने २० षटकात ७ बाद १५९ धावा केल्या. पंजाबकडून लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीपने ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल (कप्तान), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, खलील अहमद.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!