Share

Uddhav Thackeray | ज्यांना स्वत:च भविष्य माहित नाही ते राज्याच भविष्य काय ठरवणार? ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

Uddhav Thackeray |  बुलढाणा : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. बुलढाण्यातील चिखली मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभा घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे उद्धव ठाकरे गटाचे विशेष लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आज गेलेत नवस फेडायला, गेल्या आठवड्यात गेले हात दाखवायला. ज्यांना स्वत:च भवीष्य माहित नाही ते राज्याच भविष्य काय ठरवणार?. मी मनापासुन सांगतो, त्यांना गुवाहाटीला आशीर्वाद घ्यायला जाव लागलं, मी तुमचे, शेतकर्‍यांचे माता-भगिनींचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. यांना (शिंदे गट) नाव बाळासाहेबांच पाहिजे, नाव शिवसेनेच पाहिजे आणि आशीर्वाद मोदीजींचा पाहिजे. मग यांची स्वत:ची मेहनत काय?”

काय म्हणाले उद्धव ठाकरे – 

  • जुने चेहरे आज दिसत नाहीत… ते फसवे निघाले, गद्दार निघाले. आज तुमच्याकडे पाहुन वाटतंय या धगधगत्या मशाली अन्याय जाळायला निघाल्या आहेत.
  • मी मनापासुन सांगतो, त्यांना गुवाहाटीला आशीर्वाद घ्यायला जाव लागलं, मी तुमचे, शेतकर्‍यांचे माता-भगिनींचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे.
  • पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारच या ध्येयाने आज निघालो आहे. या गद्दारांना तुम्हींच आमदार-खासदार केल होतं.
  • ताई मोठ्या हुशार… थेट पंतप्रधानांना जाऊन राखी बांधली, फोटो छापुन आणला. भैया मेरे राखीके बंधन को निभाना| मग काय ईडी वाले कारवाई करणार?
  • आपल्याला हुकुमशाही हवी की लोकशाही हा महत्त्वाचा प्रश्न.
  • दसरा मेळावा शिवतिर्थावर झाला तेंव्हाच ठरवल होतं, मुंबई बाहेर पहिली सभा होईल ती बुलढाण्यात जिथे जिजाऊंचे जन्मस्थान आहे तिथेच घेईन. ही मराठी मातीतील गद्दारी गाडायची असेल तर आई जिजाऊंचा आशीर्वाद घेऊनच.
  • तुम्हीं यादी काढा यांच्यात यांच्या पक्षाचे किती आणि आयात किती? हा पक्ष आहे की चोरबाजार? स्वत:च काही शिल्लक नाही म्हणून बाहेरुन सगळे घेऊन समोर उभे केलेत.
  • तुम्हीं आमचे देव पळवणार आणि आम्हीं काय षंढासारख बघत बसणार?
  • आमच्या दैवताचा पुराने आदर्श म्हणून उल्लेख करणार आणि आम्हीं शेपुट घालुन बसायचं?
  • तो एक अब्दुल ‘गटार’….  मी मुख्यमंत्री असताना महिलांचा अपमान करणार्‍यांना हाकलल होतं. तुम्ही काय केलत?
  • हिंमत असेल तर मागील वेळेस जस जाहिर केल तेंव्हा तिथुन जाहिर करा, महाराष्ट्र सरकारमधुन बाहेर पडतोय. तुमच भविष्य पहायला ज्योतिष्याकडे जाता, नवसाच बाळ हे सरकार वाचाव म्हणून नवस फेडायला जाता.
  • आपण ‘देता की जाता’ आंदोलन केल होत तेव्हा केंद्र सरकारने शेतकर्‍यांना मदत केली होती. मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरला अधिवेशनात जाहिर केले शेतकर्‍यांना कर्जमुक्त करेन आणि करून दाखवलेलं!
  • हे खोके सरकार जेंव्हापासुन खुर्चीवर बसले तेंव्हापासुन महाराष्ट्राला पनवती लागली आहे. 1 जुलै पासुन हजारच्या आसपास शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. कशाचे नवस फेडताय?
  • वीमा कंपन्यांची मस्ती एकदा मोर्चा काढुन उतरवली होती, ती परत चढली असेल तर उतरवण्याची वेळ आली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!