🕒 1 min read
अहमदनगर: कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असणारा पेनड्राईव्ह सुपूर्द केला. त्या पेनड्राईव्हमध्ये सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तासांची रेकॉर्डींग असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात आता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कुठलंही इलेक्ट्रॉनिक आयटम मॅन्युप्लेट केलं जाऊ शकत. त्यामुळे फॉरेसिक लायब्रोटरी जोपर्यंत ते ओथेंटिक आहे असं म्हणत नाही, तोपर्यंत कोणीही यावर कमेंट करू नये, असं म्हणत प्रकाश आंबेडकर या प्रकरणावर जास्त बोलले नाहीत.
तुम्ही चोऱ्या केल्याच का..?
चोरांच्या सरकारत चोरी केल्यावर पोलीस तुमच्या पाठीमागे लागणारच. चोरी करू नये कारण तो गुन्हा आहे. तो गुन्हा केला की वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्या तपासासाठी अपॉइंट केल्या आहेत. त्या तुमच्या मागे लागणारचं. त्यामुळे तुम्ही चोऱ्या केल्याचं का? असा प्रश्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.
उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री, कर्तृत्वाने नाही – प्रकाश आंबेडकर
राज्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. जवळपास सर्वच नेते मंडळी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही अहमदनगर मध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाही असे म्हणत आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. हे चोर, लुटारूंचं सरकार आहे, अशी टीका देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
