मुंबई: राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मंत्री नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. “पवार साहेबच दाऊदचा माणूस असू शकतात” असं ट्विट त्यांनी केले आहे. त्यांचं हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
पवार साहेब नावाने मोठे झाले असले तरी मनानी मोठे नाही. त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय, त्यांनी पोसलेले कीडे आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत, पवार साहेबचं पाकिस्तानचे एजंट तर नाही ना असा संशय यायला लागला आहे, अशी जळजळीत टीका देखील निलेश राणे यांनी पवारांवर केली आहे. आता यावर राष्ट्रवादी काय आणि कसे प्रतिउत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 9, 2022
“…यश येत नसल्यानेच फडणवीसांची टोकाची भूमिका”- शरद पवार
भाजपा आमदार गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील आणि एसीपी यांना हाताशी धरून सरकारने षडयंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला आहे. तसेच पुराव्यांखातर फडणवीस यांनी व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या आरोपांमध्ये शरद पवार यांच्याही नावाची उल्लेख झाल्याने खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या आरोपांवर प्रतिउत्तर देताना शरद पवार म्हणाले कि, सरकारी अधिकाऱ्यांची १२५ तासांची रेकॉर्डींग होते ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य आहे. अनिल देशमुखांविरोधात ९० छापे टाकण्यात आले आहेत. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी केली जाते, याचं उत्तम उदाहरण देशमुखांचं आहे. आरोपांचा काही भाग मला समजला. या आरोपांमध्ये माझं अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं पण माझा याच्याशी काही संबंध नसल्याचे, पवार यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:


