🕒 1 min read
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १६ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा सोहळा पुण्यात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबई बाहेर पार पडणार आहे. राज ठाकरे आजच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करणार असून ते महापालिका निवडणुका जिंकण्याच्या निर्धारानं लढाव्यात, अशा सूचना मनसे कार्यकर्त्यांना देतील.
राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते देखील आजच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. अमित ठाकरे देखील आजच्या सोहळ्याला उपस्थित असतील. तसेच यावेळी ‘लढायचं ते जिंकण्यासाठीच’ असं घोष वाक्य मनसेने घोषित केल्याचं दिसत आहे. आता या सोहळ्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच आगामी निवडणुकीसंदर्भात कुठल्या नव्या सूचना राज ठाकरे देणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
शेन वॉर्न बांधत होता ५० लाख डॉलरचे अलिशान घर; पहा त्याच्या मृत्यूनंतर कोणाला मिळणार
-
मलायकानं शेअर केला तिच्या बेडरुममधील फोटो..! सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
