Share

“मन उडू उडू झालं” मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत…

Published On: 

मुंबई : झी मराठीवरील मन उडू उडू झालं ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेने अल्पववधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून येणाऱ्या अनपेक्षित वळणामुळे प्रेक्षकही भारावले आहेत. या मालिकेत देशपांडे कुटुंबात शलाका, सानिका आणि दीपिका या तीन मुली आहेत. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे ही दीपूची भूमिका साकारत आहे. तर सानिका देशपांडेची भूमिका अभिनेत्री रीना मधुकर साकारते आहे. रीनाने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/Ca1HhigJA_5/?utm_medium=copy_link

रीना ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. ती सोशल मीडियावर नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकतंच रीनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रिना ही एका झोक्यावर बसली असून केसात फूल माळले आहे. या फोटोत ती फार गोड दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने याला फार अनोखे कॅप्शन दिले आहे.

“तुम्ही जसे आहात तसेच योग्य आहात. ‘मी अशीच का, मी तशी का नाही’, या तक्रारी न करता स्वत:चं असणं सेलिब्रेट करा. दुसऱ्यांशी तुलना करणं सोप्पं, पण स्वत:चं कौतुक करणं कठीण झालंय का? माझं म्हणणं इतकंच की स्वतःसोबत आनंदी राहा. तुमच्यासारखं जगात दुसरं कोणीच नाही. तुम्ही स्पेशल आहात. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”, असे रीना म्हणाली.”

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!