🕒 1 min read
मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा उलटला आहे आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार ‘झुंड’ या चित्रपटाची कौतुक करताना दिसत आहे. याआधी सगळ्या दिग्दर्शकांसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. दिग्दर्शक ‘अनुराग कश्यप’ या स्क्रिनिंगनंतर जेव्हा थिएटर बाहेर आला, तेव्हा त्याने नागराज मंजुळेला डायरेक्ट मिठीच मारली आहे.
https://www.facebook.com/mahesh.bhosale.96/videos/1148223045919657/
“अनुराग म्हणाला, आतापर्यंत मी पाहिलेल्या चित्रपटांमध्ये ‘झुंड’ हा सर्वाधिक चांगला चित्रपट असून या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या रांगा लागतील. मला हा चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जाऊन फिल्ममेकिंग शिकावेसे वाटत आहे. हा चित्रपट अप्रतिम असून नागराज मंजुळेने अप्रतिम दिग्दर्शन केले आहे. चांगले जेव्हा वाटते, कोणता दिग्दर्शक आपल्या लोकांसाठी चित्रपट बनवतो आणि त्यांच्यासाठी उभा देखील राहतो. हा फक्त अप्रतिम दिग्दर्शक नाही, तर पागल आणि निडरसुद्धा आहे. या चित्रपटाच्या कास्टिंग डिरेक्टरला विशेष पुरस्कार दिला पाहिजे, कारण चित्रपटात एकाच वेळी अभिनय न येत असलेले इतके कलाकार आणि त्यांच्याकडून असा अभिनय करून घेणे हे अप्रतिम आहे.”
झुंड पाहून अनेक दिग्दर्शकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा एका वेगळ्याच लेवलचा सिनेमा आहे अस दिग्दर्शकांनी म्हटले आहे. भारताकडून हा सिनेमा ऑस्करसाठी गेला पाहिजे असंही एक दिग्दर्शकाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
