कोल्हापूर : कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांशी आज ऑनलाइन सभेत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ठाकरेंनी भाजपावर जोरदार घणाघात केला आहे.
म्हणाले, “भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, आम्ही भाजपाला सोडले म्हणजे आम्ही हिंदुत्त्वाला सोडले असे होत नाही. रामाचा जन्म झाला नसता तर यांचे राजकारण कसे चालले असते? असा सवाल करत पुढे बोलताना म्हणाले, आम्ही खोटं बोलण्यात कमी पडलो, खोटं बोल पण रेटून बोल ही शिवसेनेची संस्कृती नाही, अनेक जण खोट आणि रेटून बोलतात यावरच तर त्यांचे राजकारण सुरू आहे. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.
भाजप म्हणते आम्हाला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांबद्दल आदर आहे, मग त्यांनी युतीसंदर्भात बाळासाहेबांच्या खोलीत आम्हाला दिलेला शब्द का मोडला? आम्ही बाळासाहेबांच्या खोलीला मंदिर मानतो. याच मंदिरात युती संदर्भात बोलणे झाले होते, मग तुम्ही तुमचा शद्ब का पाळला नाही. तुम्हाला जर बाळासाहेबांबद्दल आदर आहे, तर समृद्धी महामार्गाला त्यांचे नाव देण्यास भाजप का विरोध करत आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला आहे.
महत्वाच्या बातम्या –


