मुंबई : आज आयपीएल २०२२मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगत आहे. यात कोलकाताचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली, पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला. सलामीवीर शॉ, वॉर्नर यांची अर्धशतके आणि शेवटी शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीने कोलकाताला २१६ धावांचे आव्हान दिले आहे.
दिल्लीचा डाव
मागच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या डेव्हिड वॉर्नरने आज पृथ्वी शॉसोबत दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी नवव्या षटकातच ९३ धावा केल्या. पृथ्वीने सलग दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला बाद करत कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कप्तान ऋषभ पंतने वॉर्नरला साथ दिली. वॉर्नरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा ठोकल्या. १७व्या षटकात वॉर्नर माघारी परतला. शेवटच्या दोन षटकात शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी आतषबाजी फटके खेळले. त्यांच्यामुळे दिल्लीला दोनशेपार जाता आले. २० षटकात दिल्लीने ५ बाद २१५ धावा केल्या. शार्दुलने ११ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद २९ तर अक्षरने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २२ धावा केल्या.
दोन्ही संघांची Playing XI
कोलकाता नाइट रायडर्स – अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कप्तान/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या –
- VIDEO : अचानक मैदानात घुसलेल्या त्या फॅनला रोहितला मारायची होती मिठी; विराटनं दिली ‘अशी’ रिअॅक्शन!
- “…तुम्ही धोका दिल्याचं दु:ख”; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
- IPL 2022 : लखनऊ संघात सामील झाला ‘धाकड’ खेळाडू; राहुलनं दिली जर्सी! पाहा VIDEO
- मनसेच्या विद्यार्थी सेनेने वाटले भोंगे
- “ये दोनो मिल्खा सिंग से भी तेज…”, सोमय्या पिता-पुत्रांवर संजय राऊतांचा हल्लाबोल
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

