Share

“बनावट हिंदु हृदयसम्राट लोकांनी झिडकारला”; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला?

Published On: 

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला, लोकांनी झिडकारल असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पोटनिवडणुकीसंदर्भात आयोजित केलेल्या ऑनलाइन सभेत भाजपावर केला.

पुढे म्हणाले, “हिंदू अडचणीत असताना घरी बसणारे आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया देणारे हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, पण हिंदुसम्राट होऊ शकत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून हिंदुत्वाचे मुद्दे बाजूला पडत आहेत, अशी टीका सातत्याने केली जात आहे. तसेच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हिंदुहृदय सम्राट या नावाने पोस्टरबाजी केली होती. हिंदुत्वाचाच मुद्दा उचलून धरत, राज ठाकरे यांनी मशीदीतून भोंग्यांवर नमाज पठण करायचे असेल तर मंदिरातूनही हनुमान चालीसा भोंग्यांवर लावण्यात यावे”, असे आवाहन केले होते.

भाजपनेही या मुद्द्याला चांगलेच उचलून धरले. या सर्व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता, भाजपाने उभा केलेला बनावट हिंदुहृदय सम्राट लोकांनी झिडकारला, असं स्पष्ट शब्दात सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

“भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला”; उद्धव ठाकरेंचा घणाघात
“पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेणार नाही”; अनिल परब
“56 इंचवाले देश विकत आहेत”; नाना पटोले आक्रमक
VIDEO : अचानक मैदानात घुसलेल्या त्या फॅनला रोहितला मारायची होती मिठी; विराटनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन!
“…तुम्ही धोका दिल्याचं दु:ख”; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!