कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात भाजपाने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीसंदर्भात आयोजित ऑनलाइन सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. हिंदुहृदय सम्राटांनी निर्माण केलेली शिवसेना आता राहिलेली नाही, असा आरोप नुकतात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केला होता.
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. भाजपासारखी आम्ही छुपी युती करत नाही, आम्ही समोरून वार करतो. असा थेट इशारा ठाकरेंनी दिला.
महत्वाच्या बातम्या –
“56 इंचवाले देश विकत आहेत”; नाना पटोले आक्रमक
VIDEO : अचानक मैदानात घुसलेल्या त्या फॅनला रोहितला मारायची होती मिठी; विराटनं दिली ‘अशी’ रिअॅक्शन!
“…तुम्ही धोका दिल्याचं दु:ख”; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
IPL 2022 : लखनऊ संघात सामील झाला ‘धाकड’ खेळाडू; राहुलनं दिली जर्सी! पाहा VIDEO
मनसेच्या विद्यार्थी सेनेने वाटले भोंगे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

