मुंबई : दोन दिवसांपूर्वी काही एसटी कामगारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आंदोलन करत हल्ला केला होता. या वेळी काही आंदोलकांनी दगडफेक कर, चप्पलफेक करत गोंधळ घातला होता. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते व १०९ आंदोलकांना अटक करण्यात आली होती.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज एसटी कामगार यांच्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अनिल परब म्हणाले “येत्या २२ तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश आहेत. २२ तारखेपर्यंत जे कामावर रुजू होतील त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जाणार नाही. या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही.22 तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाही तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचा विचार ही केला जाणार आहे. पाच महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस आगाराने सर्व एसटी गाड्याची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे.”
सिल्वर ओक येथील हल्ल्याप्रकरणी काल दुपारी किल्ला कोर्टात सदावर्ते यांच्यासह यातील ११० आरोपींना हजर करण्यात आले. सदावर्ते यांच्यावर आरोप गंभीर असून त्यांना १४ दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात केली. सदावर्ते यांनी चिथावणी दिल्याने हा हल्ला झाला असल्याचे घरत यांनी सांगितले. सर्वच आरोपींना १४ दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी घरत यांनी यावेळी केली होती. सदावर्ते यांनी दोन दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचा निर्णय यावेळी न्यायालयाने दिला.
महत्त्वाच्या बातम्या :
- “…तुम्ही धोका दिल्याचं दु:ख”; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
- IPL 2022 : लखनऊ संघात सामील झाला ‘धाकड’ खेळाडू; राहुलनं दिली जर्सी! पाहा VIDEO
- मनसेच्या विद्यार्थी सेनेने वाटले भोंगे
- “ये दोनो मिल्खा सिंग से भी तेज…”, सोमय्या पिता-पुत्रांवर संजय राऊतांचा हल्लाबोल
- “स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही”, हनुमान चालीसा प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची मनसेवर टीका


