Share

“शरद पवार नास्तिक आहेत हे त्यांना इतकं का झोंबलं?’; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: घोषणा केल्याप्रमाणे आज १ मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभेला सुरुवात झाली आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याने या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, राज ठाकरेंच्या आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर धर्माच्या नावावरून शरद पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. आता या सभेत राज ठाकरेंनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, शरद पवार नास्तिक आहेत. हे म्हटल्यावर त्यांना झोंबले. त्यानंतर देवाचे, पूजेचे फोटो बाहेर काढले. परंतु शरद पवारांच्या कन्येने स्वत: लोकसभेत याची कबुली दिली आहे, माझे वडील नास्तिक आहेत.  आता यावर मी आणखी काय पुरावा देऊ. जिकडे सभा घेत आहेत तिकडे शरद पवार बोलत आहेत की, राज ठाकरेंनी त्यांच्या आजोबांची पुस्तके वाचली पाहिजेत. मी वाचलीयेत. पवार साहेब तुम्ही अपेक्षित असलेल्या गोष्टी फक्त तुम्ही वाचल्या आहेत. पूर्ण पुस्तके वाचा संदर्भासहित वाचा. मग तुम्हाला कळेल.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले,  “माझ्या आजोबांनी जे लिहीले आहे. ते जर व्यवस्थित तुम्ही वाचले तर तुम्हाला कळेल, ते परिस्थितीला धरून आहे, व्यक्ती सापेक्ष आहे. जाती पातीमध्ये भेद निर्माण करणारं नाही. हा हिंदू धर्म मानणारा माणूस  होता तो, पूजा करणारा माणूस होता तो. या धर्मांमधल्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्यावर बोट दाखवणारा माणूस होता तो की ही गोष्ट होता कामा नये.

काय म्हणाले होते शरद पवार? 

“गेल्या काही दिवसांपासून जात, धर्म यांच्या नावाने पुन्हा एकदा देशाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू केला जातोय. लोकांचे मुलभूत प्रश्न हे महागाई, अन्नधान्य आणि रोजगारी हे आहेत. या प्रश्नांकडे कुणाचं लक्ष नाही. सर्व समाजाला मुख्य प्रश्नापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही हनुमान चालिसा लावणार, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, अशाच मागण्या केल्या जात आहेत. या सगळ्यामुळे सामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटणार आहेत का? त्यांच्या भूकेचा प्रश्न सुटणार आहे का”? असा सवाल करत राज ठाकरेंना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला होता.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!