🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचे कर्णधारपद स्वीकारले आहे. रवींद्र जडेजाने पद सोडल्यानंतर धोनीकडे ही जबाबदारी देण्यात आली. आज पुण्यात चेन्नईचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना रंगत आहे. यावेळी धोनी टॉससाठी मैदानात आला, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये उत्साहाचे वातावरण होते. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून आपली जबाबदारी स्वीकारली आणि त्याने आयपीएलमधील आपल्या भविष्यावर एक मोठे विधानही केले.
नाणेफेकी दरम्यान, महेंद्रसिंह धोनीला विचारण्यात आले, की तो यापुढेही पिवळी जर्सी (CSKसाठी) खेळताना दिसेल का? यावर धोनीने हसत उत्तर दिले आणि म्हणाला, ”नक्कीच, तुम्ही मला पिवळ्या जर्सीत पहाल, परंतु ती ही (CSK) असेल की दुसरी याबद्दल माहिती नाही.” धोनीच्या या विधानावरून अनेक अर्थ काढले जात आहेत, कारण ४० वर्षीय धोनीबद्दल असा अंदाज बांधला जात होता, की हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो. त्यामुळेच त्याने कर्णधारपदही सोडले होते, पण संघाची स्थिती पाहता धोनीला पुन्हा कर्णधारपद सांभाळावे लागले.
"You'll definitely see me in the yellow jersey, whether it is this one, or some other one, you never know"pic.twitter.com/KejlymtTAG#IPL2022 #MSDhoni #SRHvsCSK
— Wisden India (@WisdenIndia) May 1, 2022
चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम चांगला ठरलेला नाही. सीएसकेने आतापर्यंत त्यांच्या ८ पैकी ६ सामने गमावले आहेत. यामुळेच चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेच्या मध्यात कर्णधार बदलला. ”रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि धोनीला चेन्नई संघाचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. धोनीने संघाच्या हितासाठी हे आवाहन मान्य करत स्वत: कर्णधारपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे”, असे चेन्नईने सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
