🕒 1 min read
औरंगाबाद : आज १ मे महाराष्ट्र दिनाला राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सुरू आहे .या सभेत राज ठाकरेंच्या रडारवर कोण कोण असतील, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लोकांमध्ये आहे. या सभेला प्रचंड गर्दी झाली आहे. या सभेची उत्सुकता लोकांमध्ये दिसून येत आहे.
सभे दरम्यान राज ठाकरे यांना सभेतील गर्दीत काहीतरी काहीतरी विचित्र दिसलं. यावेळी राज ठाकरे यांनी दमच दिला. “या सभेमध्ये काही वेडवाकडं केलं तर चौरंग करून घरी पाठवीन.” असं राज ठाकरे जाहीर सभेत म्हणाले. यामुळे सभेत काही वेळ लोक गोंधळात पडले. राज ठाकरे यांनी लोकांना बसा अशी विनंती केली.
महाराष्ट्र दिनी १ मे रोजी राज ठाकरेंची सभा औरंगाबाद येथे होत आहे. या सभेला परवानगी दिली तर, सभा उधळून लावू अशी धमकी भीम आर्मी कडून देण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या सभेला शेवटपर्यंत विरोध राहील, असे भीम आर्मीने सांगितले होते. राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदू मुस्लिम दंगली होणार आहेत, असे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होऊ देणार नाही, असे भीम आर्मी कडून सांगण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हा दम दिला. सभेत काही घातपात होण्याची शक्यता होती. म्हणूनच “या सभेमध्ये काही वेडवाकडं केलं तर चौरंग करून पाठवीन.” असे राज ठाकरे भाषणात बोलले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
