Share

“यापुढे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार” ; राज ठाकरेंची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : घोषणा केल्याप्रमाणे आज १ मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभेला सुरुवात झाली आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याने या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. दरम्यान, राज ठाकरेंच्या आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला चांगलेच पाहायला मिळाले. आज राज ठाकरे सभेत काय बोलणार यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

आज सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, मुंबईला गुडीपाडव्या दिवशी सभा घेतली. त्या सभेनंतर बरेच लोक बडबडायला लागली. त्यांना उत्तर देण्यासाठी एक उत्तर सभा ठाण्यामध्ये घेतली. खरं तर दोनच सभा मी घेतल्या, पण या दोन सभांवरती किती बोलत आहेत. जेव्हा ठाण्याची सभा झाली तेव्हा आमच्या एका मनसैनिकानी फोन केला आणि म्हणाला, सर आपण एक तरी संभाजीनगर मध्ये सभा घेऊ. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा विषय फक्त संभाजीनगर मधील नाही. माझ्या यापुढच्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. तसेच मी  विदर्भातही जाणार आहे, आपल्या कोकणातही जाणार आहे. याबरोबरच उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे., अशी घोषणा यावेळी बोलताना राज ठाकरेंनी केली आहे.

अनिल परब यांची टीका –

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अनिल परब राज ठाकरेंच्या होणाऱ्या सभेवर बोलताना म्हणाले की, ‘सभा घेण्याचा हा त्यांचा अधिकार आहे, पण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नये. मनसेने किंवा कुणी हिंदुत्वाचा मुद्दा एका दिवसात उचलून चालत नाही. शेवटी सर्वांना माहिती आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वासाठी काय योगदान आहे’.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!