🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ४५व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला (DC vs LSG) ६ धावांनी मात देत प्लेऑफच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल, हुडा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनऊने दिल्लीला १९६ धावांचे आव्हान दिले. प्रत्त्युत्तरात दिल्लीकडून ऋषभ पंत, अक्षर पटेल यांनी झुंज दिली पण ते अपयशी ठरले. २० षटकात दिल्लीला १८९ धावांपर्यंत पोहोचता आले.
दिल्लीचा डाव
लखनऊच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ (५) आणि डेव्हि़ड वॉर्नर (३) स्वस्तात बाद झाले. दुष्मंथा चमीराने पृथ्वीला तर मोहसिन खानने वॉर्नरला बाद केले. त्यानंतर मिचेल मार्शने ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३७ धावांची खेळी केली. त्याला कप्तान ऋषभ पंतने साथ दिली. पंतने ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. मोहसीनने पंतची दांडी गूल करत दिल्लीला संकटात टाकले. रोवमन पॉवेल (३५) आणि अक्षर पटेल (४२) यांनी झुंज दिली खरी पण आव्हान त्यांना पेलले नाही. २० षटकात दिल्लीला ७ बाद १८९ धावा करता आल्या. लखनऊकडून मोहसिन खानने ४ बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
An elated dugout as @LucknowIPL win by 6 runs against #DelhiCapitals.#TATAIPL #DCvLSG pic.twitter.com/EVagwBHHVA
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
लखनऊचा डाव
केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी लखनऊला ४२ धावांची सलामी दिली. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने डी कॉकला (२३) झेलबाद करत लखनऊला पहिला धक्का दिला. त्यानंतर राहुलने दीपक हुडासोबत भागीदारी करत संघाला शतकापार पोहोचवले. हुडाने ६ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. ठाकूरने त्याला १५व्या षटकात माघारी पाठवले. त्यानंतर फटकेबाजी करणारा राहुलही १९व्या षटकात ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. राहुलने ४ चौकार आणि ५ षटकारांसह ७७ धावा केल्या. शेवटच्या षटकात मार्कस स्टॉइनिसने फटकेबाजी केल्यामुळे लखनऊला २० षटकात ३ बाद १९५ धावांपर्यंत पोहोचता आले.
दोन्ही संघांची Playing 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया.
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
