मुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातलं वाद सर्वांनाच माहिती आहे. किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यात अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. शिवसेनाकडून किरीट सोमय्यांना अनेकदा मारहाण करण्यात आली. किरीट सोमय्या यांच्याकडून अनेकदा शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. नुकतंच किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते व मंत्री अनिल परब यांची ईडीकडे तक्रार केली त्यानुसार ईडीने अनिल परब यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.
किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना पुन्हा एकदा टोला हाणला आहे. “अब तेरा क्या होगा कालिया, ईडीच्या कारवाईनंतर आता अनिल परबांना झोप येत नसेल आणि उद्धव ठाकरे यांनाही झोप येत नसेल. उद्धव ठाकरे यांनीच सचिन वाजे यांची नियुक्ती केली होती आणि सचिन वाजे कडून आलेला पैसा अनिल परब यांच्या रिसॉर्टमध्ये गुंतविण्यात आला होता, त्यामुळे आधी अनिल देशमुख तर आत गेले आता अनिल परब तुमचं काय होणार ?” असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
पुढे सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरेंना इतकी भीती कशाची वाटते? स्वतःच्या पक्षाचे आणि मित्र पक्षाचे आमदार विकाऊ आहेत, असे संजय राऊत आरोप करत आहेत. मग बईमान कोण आहे? शिवसेनेचे आमदार की शिवसेनेचे नेते ? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
“संजय राऊत यांची १४ करोडची प्रॉपर्टी जप्त झाल्यानंतर त्यांना दिवस – रात्र फक्त ईडीचे स्वप्न दिसत आहेत. त्यांना शुभ रात्री,” असा खोचक टोला ही त्यांनी संजय राऊत यांना लगावला या.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
