🕒 1 min read
मुंबई : काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्यांचं प्रमाण पुन्हा एकदा वाढलं आहे. बँकेतील कर्मचाऱ्याची हत्या, त्यानंतर कामगारांच्या हत्येने काश्मीरमध्ये पुन्हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शाहांनी तत्काळ सुरक्षेच्या कारणावर बैठक बोलावली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी काश्मिरी पंडितांचा मुद्दा घेत भाजपवर निशाणा साधला आहे.
मोहनराव भागवत बरोबर बोलले मी त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. या देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये खासकरून जम्मू-काश्मीरमध्ये कश्मीरी पंडित पेक्षा, नागरिक हिंदू असेल किंवा मुसलमान असेल हा अत्यंत धोक्याखाली जीवन जगतो आहे. चित्रपटाचं प्रमोशन केलं जातं निर्मात्याने 400, 500 कोटी रुपये कमावले, काश्मिरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायन सुरू आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
