मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद विरोधकांवर टीका करण्यात सध्या नेहमीच पुढे असतात. विरोधकांवर टीकेची त्या एकही संधी सोडत नाही. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ऐकेरी उल्लेख करत खालच्या भाषेत टीका केली होती. यानंतर दिपाली सय्यद यांनी देखील जशाच तसे उत्तर दिले होते. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. दरम्यान, दिपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा विरोधकांना इशारा दिला आहे.
दिपाली सय्यद म्हणाल्या, “अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ. मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ. दिल्लीत हुजऱ्या करणाऱ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवून देऊ. दिल्ली समोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही.”
दिल्लीतल्या बापाला प्रतीउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमलाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडग ढोंग करतय, महाराष्ट्र प्रेमाच सोंग करतय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार. @ShivSena @bjpsamvad
— Deepali Sayed (@deepalisayed) June 3, 2022
आता दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये दीपाली सय्यद यांनी अप्रत्यक्षपणे पण इशारा देत भाजप आणि राज्यातल्या भाजप नेत्यांवर टीका केली आहे. दिपाली सय्यद आपल्या ट्विट मध्य म्हणतात, “दिल्लीतल्या बापाला प्रतीउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमलाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडग ढोंग करतय, महाराष्ट्र प्रेमाच सोंग करतय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार.”
यामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि दीपाली सय्यद यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार, अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

