🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पूर्वनियोजित शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने तयारी सुरू केली आहे. त्याच्या तयारीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “तो त्याच्या गोलंदाजीत सातत्यपुर्ण कामगिरी करण्यास उत्सुक आहे. भारतीय क्रिकेट संघ १ जुलै रोजी इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. मागील वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सप्टेंबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता.
1 जुलै रोजी होणार्या कसोटी सामन्यापूर्वी सिराजने सांगितले की, “सध्या आमच्याकडे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळण्याआधी थोडा वेळ आहे. त्यामुळे सध्या मी माझ्या घराजवळील मैदानावर गोलंदाजीचा सराव करत आहे. त्याचबरोबर फिटनेस सुधारण्याकडे ही लक्ष देत आहे. कारण टी-२० मधून लगेच कसोटी क्रिकेट खेळणे हा एक मोठा बदल आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ते लांबलचक स्पेल टाकण्यासाठी मला खरोखर माझ्या सातत्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि तेच माझे एकमेव ध्येय असेल.”
सिराजनं केलं रोहितचं कौतुक
यावेळी मोहम्मद सिराजने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचेही प्रशंसा केली. तो म्हणाला की, रोहितला सर्व खेळाडूंची मानसिक स्थिती समजते. जेव्हा एखादा गोलंदाज कठीण परिस्थितीत असतो तेव्हा तो प्लॅन बी घेऊन येतो आणि मदत करतो. तो गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्यास नेहमीच प्रवृत्त करतो. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेणार्या कर्णधाराच्या हाताखाली खेळणे हा एक अद्भुत अनुभव आहे.”
Mohammad Siraj said, "Rohit Sharma understands the mental state of a player. Whenever we've a tough time out there on the field, he is the one who motivates and comes with plan B. It's great to work under a captain who understands you so well". (To ANI).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 3, 2022
इंग्लंडविरुद्धच्या ५व्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. मात्र या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत युवा खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघाचे कर्णधारपदही केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे. ही मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला अध्याप टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारताला या मालिकेत पहिला विजय नोंदवण्याची संधी आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
