मुंबई : काल ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले.ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्याचा निषेध केला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले कि, आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, त्यामुळे जाता, जाता त्यांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय घेतला तेव्हा आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते काय करीत होते. शहराचे,गावाचे, रस्त्याचे नाव बदलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घाणेरडे राजकारण केले आहे, आघाडीच्या नेत्यांचा प्रतिमांना जोडे मारा, असे त्यांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी सांगतिले. “आम्ही कायदेशीर लढाई लढू, रत्यावर उतरु,’ असा इशार जलील यांनी यावेळी दिला.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काल रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालनाकडे सुपूर्द केला. तसेच आज मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. आशीर्वाद दिले. मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल, त्या पापाचे धनी ज्यांना व्हायचंय, त्यांना होऊ द्या. मी नाही होणार. असं देखील ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

