Share

Prakash Raj : “चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा…”, प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२९ जून) फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी खास उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट लिहिली आहे.

“तुम्ही खूप छान काम केले आहे उद्धव ठाकरे सर आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळले त्यासाठी महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा अधिक काळ टिकेल. तुमच्यात आणखी शक्ती आहे.”, अशी पोस्ट प्रकाश राज यांनी ट्वीटरवर केली आहे.

सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!