मुंबई : एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिंदे गटात शिवसेना नेत्यांनी शामिल होण्याचा निर्णय घेत मविआचा पाठींबा काढून घेतला. काल फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबार आता कलाकार देखील आपली प्रतिक्रिया मांडत आहेत. आता नुकतंच प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
उर्मिला मातोंडकर कायम वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वतःचे मत मांडत असतात. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी एक ट्विट केले आहे. “धन्यवाद उद्धव ठाकरेजी. तुमच्या नेतृत्वामुळे आपले राज्य कोविडसारख्या कठीण काळातही जातीयवाद आणि द्वेषापासून दूर राहिले. तुमचे नेतृत्व अनुकरणीय, पूराग्रहरहित, धाडसी, प्रतिक्रियात्मक, पारदर्शी, संवादप्रिय होते. जय महाराष्ट्र”. असे त्यांनी ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.
Thank you @OfficeofUT ji for your leadership in the most trying times of covid n keeping our state away from communal hatred n bigotry. Your leadership has been exemplary, unbiased, courageous, responsible,transparent,communicative ????????
Jai Maharashtra ???? pic.twitter.com/DQUzw4PBzT— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) June 29, 2022
दरम्यान काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार विश्वासमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.
महत्वाच्या बातम्या :


