Share

Political Crisis : “प्रत्येक लाडूंची किंमत ५० ते १०० कोटी”, कॉंग्रेसचा भाजपवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिंदे गटात शिवसेना नेत्यांनी शामिल होण्याचा निर्णय घेत मविआचा पाठींबा काढून घेतला. काल फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान या सर्व घडामोडींवर भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना चंद्रकांत पाटील लाडू भरवितानाचा फोटो पोस्ट करत श्रीनिवास बी.व्ही यांनी म्हटले कि, “प्रत्येक लाडूची किंमत ५० ते १०० कोटी आहे. यात सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर विभागाचा (IT) मेहनतानाचा समावेश नाही”

दरम्यान काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!