Share

Bacchu Kadu : लॉजिक की मॅजिक? ठाकरे सरकार कोसळताच ‘त्या’ प्रकरणी बच्चू कडूंना ‘क्लीन चिट’ 

Published On: 

मुंबई: एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिंदे गटात शिवसेना नेत्यांनी शामिल होण्याचा निर्णय घेत मविआचा पाठींबा काढून घेतला. शिंदे गटात बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचाही समावेश होता. काल फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. मात्र यात बच्चू कडू यांच्याबद्दल लॉजिक म्हणावं की मॅजिक असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. या प्रकरणातून बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता झाली असून बच्चू कडू यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली आहे.

सदरील तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी ९५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. सिटी कोतवाली पोलिसात बच्चू कडू यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. मात्र पुरावे सापडले नसल्याने ही फाईल बंद करण्यात आली आहे. तिकडे मविआ सरकार कोसळले आणि इकडे बच्चू कडू यांची फाईल बंद झाली, त्यामुळे अनेक चर्चा सध्या राजकारणात रंगत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!