मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आज रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालनाकडे सुपूर्द केला. याच दरम्यान काल ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाची अखेरची बैठक पार पडली. या बैठकीत औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्याचा निषेध केला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले कि, जनता ठरवेल व औरंगाबादचे नाव काय असेल. तुम्ही एक घाणेरडं राजकारण करून गेलात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. इतिहासात नाव बदलले जाते, इतिहास नाही, औरगांबादची जनता ठरवेल, याचं नाव काय असेल. तुम्ही एक घाणेरडं राजकारण करून गेलात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, काल औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी नाव बदलावर आक्षेप घेतला होता.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

