Share

राज ठाकरेंनी नक्की कोणत्या प्रकारचं हिंदुत्व स्वीकारलं? – संजय राऊत

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत भाजप मनसेवर सतत हल्लाबोल करत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या  महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप आणि मनसे असे चित्र पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची राज ठाकरेंच्या मागे फरफट होतेय का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेची फरफट कुठेच होऊ शकत नाही, खास करुन हिंदुत्वाच्या बाबतीत. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तेत आहोत. पण आमची हिंदुत्वाची भूमिका कायम आहे. आता राज ठाकरे यांनी नक्की कोणत्या प्रकारचं हिंदुत्व स्वीकारलं याबाबत संशोधन करावं लागेल.”

“उलट शिवसेनेनं तपासायला हवं राजकारणापुरतं आहे की भाजपला हवं ते हिंदुत्व आहे. शिवसेनेने हिंदुत्वात हिंदुत्वासाठी त्यागच केलाय. सत्तेचाही मोह आम्हाला नाही. आजचं जे हिंदुत्व आहे ते खास करुन महाराष्ट्रातील हिंदू मतांमध्ये फुट पाडायची आणि शिवसेनेला अपशकून करायचा यापलीकडे हे नवीन हिंदुत्व झेप घेत आहे. त्यामुळे आमची फरफट व्हायचा प्रश्न नाही. उलट भाजपमागे कोणाची फरफट होतेय हे पाहावं लागेल.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!