🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत भाजप, मनसेवर सतत हल्लाबोल करत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप आणि मनसे असे चित्र पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं. त्यामुळे शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे.
राज ठाकरेंच्या सभांवर संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात सभांवर कोणालाही बंदी नाही. आम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. ज्या पक्षाला दुसऱ्या पक्षाकडून ऑक्सिजन दिला जातो, त्यांच्याकडे का लक्ष द्यायचं? तसेच विचार भाड्याचा आहे, भूमिका भाड्याची आहे. प्रत्येक गोष्ट ही प्रायोजित असते, यावर का बोलायचं.”
“राज ठाकरेंचा अजेंडा कोण ठरवतो यावरही चर्चा होऊ द्या. शिवसेनेचा अजेंडा शिवसेना ठरवते. महाराष्ट्रातील सत्तेची घडी आहे त्याचं नेतृत्व शिवसेना करतेय हे लोकांची पोटदुखी आहे. आम्हाला कोणाला विचारावं लागत नाही की काय करायचं”, असा टोलाच राज ठाकरेंना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
