सातारा : गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मात्र आता कोल्हापूर, बीड किंवा पुणे पोलीस सदावर्ते यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणीही सदावर्ते यांच्यावर तक्रार दाखल आहेत. मराठा आरक्षणाच्यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर, आता सदावर्ते यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.
सदावर्ते यांच्या अडचणींना मुंबई एसटी आंदोलनापासून सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या अडचणींचा आलेख वाढतच गेला. मराठा आंदोलनावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले व संभाजीराजे भोसले यांच्या संबंधी वादग्रस्त विधान केल्यामुळे, सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना मुंबईतून ताब्यात घेतले होते.
सदावर्ते यांना पहिल्यांदा मुंबईत अटक झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर सातारा, कोल्हापूर, बीड, पुणे अशा विविध ठिकाणी तक्रार दाखल झाले आहेत. या तक्रारी मराठा आरक्षण व एसटी आंदोलन या प्रकरणामध्ये झाले आहेत. मुंबई कोर्टाने सदावर्तेना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, इतर ठिकाणचे पोलिसही सदावर्ते यांचा ताबा घेणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


