मुंबई: चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार रवींद्र जडेजाची नेतृत्वाची सुरुवात खराब झाली आहे. त्याचे मैदानावरील निर्णय अयोग्य ठरताना दिसत आहे. त्यामुळे जडेजा संघाला सामना जिंकून देऊ शकला नाही. आधी चेन्नईसाठी धोनी त्याच्या जबरदस्त निर्णयांसाठी ओळखला जात होता. हरलेला सामना तो आपल्या डावपेचांनी आपल्या बाजूने वळवायचा. अशात गुजरात विरुद्ध सामन्यात जडेजाच्या एका निर्णयाने त्यांना पराभव मिळवून दिला आहे.
गुजरात विरुद्ध सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजीला धार नव्हती, ज्यासाठी त्याचे गोलंदाज ओळखले जातात. चेन्नईच्या गोलंदाजांनी शेवटच्या ६ चेंडूंमध्ये खतरनाक गोलंदाजी केली असती तर सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असता. मात्र रवींद्र जडेजाने सर्वाधिक धावा देणाऱ्या क्रिस जॉर्डन जॉर्डन याला शेवटचे षटक सोपवले. ज्यामुळे चेन्नईला सामना गमवावा लागला.
क्रिस जॉर्डनने (chris jorden) सामन्यात भरपूर धावा उधळ्यानंतरही त्याला शेवटची ओव्हर देण्याचे कारण देत रवींद्र जडेजा (ravindra jadeja) म्हणाला, “आम्ही चांगली सुरुवात केली होती. पहिल्या ६ षटकांमध्येही आम्ही चांगली गोलंदाजी केली. आम्ही फलंदाजी करत होतो तेव्हा विकेट थोडी वरच्या बाजूला होती. चेंडू पकड घेत होता, पण शेवटच्या ५ षटकांमध्ये आम्हाला आमच्या रणनीतीनुसार ते करता आले नाही. मला वाटले जॉर्डन त्याचा यॉर्कर वापरेल, पण तो करू शकला नाही. हेच टी-२० क्रिकेटचे सौंदर्य आहे.”
शेवटच्या षटकात गुजरात संघाला विजयासाठी १३ धावांची गरज होती. अशा स्थितीत कोणताही कर्णधार आपल्या सर्वोत्तम गोलंदाजाला बोलावेल , पण जडेजा ते करू शकला नाही. त्याने शेवटचे षटक सर्वाधिक धावा देणाऱ्या ख्रिस जॉर्डनला दिले. ख्रिस जॉर्डनने या सामन्यात ३.५ षटकात ५८ धावा लुटल्या. या सामन्यात तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : सलग सहा पराभव..! मुंबई इंडियन्सची वाईट अवस्था पाहून मलिंगा म्हणतो, “हा संघ नेहमीच…”
- “आता संयम संपला…”; संजय राऊतांचा भाजपला इशारा!
- IPL 2022 : धन्य झाला ऋतुराज..! आई-बापानं स्टेडियममधून पाहिली पोराची बॅटिंग; PHOTO ठरतोय लक्षवेधी!
- भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना धमकी? केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता!
- IPL 2022 : दुखापतींचं ग्रहण संपेना..! दीपक चहरपाठोपाठ अजून एक खेळाडू गेला स्पर्धेबाहेर; KKR संकटात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

