गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत महागाई विरोधात आवाज उठवला आहे. काँग्रेसने ७० वर्षात काय केलं असं विचारणाऱ्यांना एवढच सांगायचं आहे कि जेव्हा जागतिक बाजारात महागाई वाढली होती तेव्हा भारतात ती रोखून धरायचं काम आम्ही केलं होत,
असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या राज्यातील भाजप पक्ष आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.